Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

05.02.2018

प्रजासत्ताक दिन शिबिरामधे उत्तम कामगिरी केल्याबद्दल एनसीसी चमूला राज्यपालांची शाबासकी

यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामद्धे लक्षणीय कामगिरी करणार्‍या राज्याच्या एनसीसी चमूला राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजभवन येथे निमंत्रित करून कौतुकाची थाप दिली.

 

यावर्षी 72 मुले व 39 मुलींचा समावेश असलेल्या महाराष्ट्र एनसीसी चमूने 6 वैयक्तिक तसेच 15 सांघिक पारितोषिके प्राप्त केली.

 

सोळाव्या शतकापर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा वाटा एक चतुर्थांश होता. परकीय राजवटीमुळे देशाचे आर्थिकसामाजिक व सांस्कृतिक मोठे नुकसान झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र भूमिनेच परकीय सत्तेला सर्वाधिक प्रखर विरोध केला होता याची आठवण करून देतानायुवकांनी राष्ट्रनिर्माण कार्याला हातभार लावल्यास भारत पुन्हा एकदा जागतिक महासत्ता होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

 

एनसीसीच्या चमूने यावेळी देशभक्तीपर समूह गीते तसेच शास्त्रीय नृत्य यांचा समावेश असलेला एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

  

वैयक्तिक कामगिरी

कॅडेटचे नाव

ऑल इंडिया बेस्ट कॅडेट (आर्मी)

कॅडेट गुरजीत सिंग

ऑल इंडिया बेस्ट कॅडेट (एअर फोर्स)

कॅडेट सर्वेश नवेंडे

प्रजासत्ताक दिन परेड मुलींच्या पथकाचे नेतृत्व

कॅडेट पूजा निकम

ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प नेमबाजी मधील सुवर्ण पदक

कॅडेट देविका सराफ

गिर्यारोहण अभ्यासक्रमात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी

कॅडेट कस्तुरी सावेकर

भारतीय नेमबाजी संघामध्ये निवड

कॅडेट तेजश्री कांबळे

  

एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल गजेंद्र प्रसादउपमहासंचालक ब्रिगेडियर जगदीप सिंग तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.       

***