Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

12.01.2018

तंत्रज्ञानाचा अवलंब करुन हिंदी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यावे - राज्यपाल चे. विद्यासागर राव


 

तंत्रज्ञानाचा अवलंब करुन हिंदी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यावे

राज्यपाल चे. विद्यासागर राव

 

मुंबईदि. 12: जगातील अनेक भाषा संकटात असताना हिंदीची वाढ होत आहे. मातृभाषेतून देण्यात आलेले ज्ञान सुलभरित्या समजते त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाचा अवलंब करुन हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यावे लागेलअसे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले.

            केंद्र शासनाच्‍या राजभाषा संचालनालयामार्फत राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स (आरसीएफ) कॉलनी येथे आयोजित पश्चिम व मध्य क्षेत्रांचे राजभाषा संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी राजभाषा विभागाचे सचिव प्रभास कुमार झा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

            हिंदी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती किंवा सांस्कृतिक वारसा आहेअसे सांगून राज्यपाल पुढे म्हणालेप्रादेशिक भाषांना जोडून ठेवणारा धागा आहे. देशातील एकता,एकात्मतासार्वत्रिकता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी हिंदीचे योगदान सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या ऐतिहासिक भू दान आंदोलनाच्या यशस्वीतेचे श्रेय हिंदीला दिले. महात्मा गांधींनी देशाच्या एकात्मतेसाठी राजभाषेचा आग्रह धरला. स्वातंत्र्य चळवळी दरम्यान प्रमुख नेत्यांनी स्वराज्य आणि स्वदेशीचा पुरस्कार केला. त्यामुळे हिंदी बोलण्याचा संकोच बाळगता कामा नये.

            ते पुढे म्हणालेविविध भागात प्रादेशिक भाषा बोलल्या जात असताना इंग्रजीतील ज्ञान त्या त्या भाषेतही उपलब्ध करुन दिले पाहिजे. आज न्यायालयांमध्ये प्रादेशिक भाषांचा आग्रह धरला जातो. कनिष्ठ न्यायालयामार्फत देण्यात येणारे निर्णय प्रादेशिक भाषेत तर वरिष्ठ न्यायालयांमध्ये इंग्रजीच्या वापरांमुळे दिल्या जाणाऱ्या निकालाबाबत सामान्य माणसांच्यात संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे वरिष्ठ न्यायालयांनीही राजभाषेत व प्रादेशिक भाषेत निकाल देण्याची गरज आहे, असे करणाऱ्या न्यायाधिशांना पुरस्कार देण्याचा विचार करावा,अशी सूचनाही त्यांनी केली.

            ते पुढे म्हणालेप्राथमिक ते माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून झाल्यास विषयांचे आकलन सुलभरित्या होते हे संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिकसामाजिक व सांस्कृतिक संघटनेने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मातृभाषा चांगल्या प्रकारे येत असल्यास इतर भाषा शिकणे सोपे जाते. यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांनी आपल्या भाषेविषयी न्यूनगंड बाळगू नयेअसे आवाहनही त्यांनी केले.

            आज चीनकोरिया सारख्या देशांना जुन्या उत्कृष्ट मराठी चित्रपटांच्या पटकथांविषयी कुतूहल असताना सांस्कृतिक कार्य विभागानेही यात मागे न राहता हिंदीमध्ये रुपांतरण करण्याचे काम करावेअसेही ते म्हणाले.

            प्रभास कुमार झा म्हणाले कीराजभाषा विभागाने देशातील 14 भाषातून सोप्या पद्धतीने हिंदी शिकण्यासाठी लीला’ मोबाईल ॲप सुरू केले आहे. यामध्ये संस्कृती व साहित्याच्या विषयाचाही समावेश करण्यात येणार आहे. जनतेला त्यांच्या भाषेत सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी राजभाषा विभाग प्रयत्नशील आहे. बँकींग डाटाबेसचे डिजीटायझेशन करण्याचे काम सुरु असून त्याद्वारे सर्व बँकींग सेवा तेथील प्रादेशिक भाषेत मिळू शकतील. हिंदीच्या वाढीसाठी हिंदी तंत्रज्ञान संशोधन केंद्र’ स्थापन करण्यात आले असून लवकरच हिंदी बहुभाषिक सॉफ्टवेअर इंटरनेटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अनुवाद’ हे इतर भाषातील मजकुराचे भाषांतर करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून ते देशातील सर्व केंद्र शासनाच्या संस्थांना मोफत उपलब्ध करुन दिले जाईल. तंत्रज्ञानाचा अवलंब राजभाषा व प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी करण्यासाठी करण्यात येत आहे.

            या कार्यक्रमात मध्य व पश्चिम विभागातील शासकीय मध्य विभाग आणि पश्चिम विभागातील केंद्र शासनाचे विविध विभागसार्वजनिक उपक्रमराष्ट्रीयकृत बँकसार्वजनिक विमा कंपन्या आदींना त्यांच्या कामकाजात उत्कृष्टपणे हिंदीचा अवलंब केल्याबद्दल 2017 साठीचे राजभाषा पुरस्कार’ राज्यपालांच्या हस्ते देण्यात आले.  राजभाषा विभागाच्या राजभाषा भारती’ या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

            राजभाषा विभागाचे सहसचिव डॉ. बिपीन बिहारी यांनी स्वागत केले. भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमारआरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उमेश धात्रक,गुजरातच्या मुख्य आयकर आयुक्त आशा अग्रवाल यांनी मनोगत केले. इस्पातभिलाईचे महाव्यवस्थापक अनिरुद्ध गुहाराजभाषा विभागाचे संदीप आर्य आदी उपस्थित होते.

0000

Mahanews