Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

10.01.2018

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहार संघाचे पत्रकार पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान

राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहार संघाचे पत्रकार पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान  

 

राज्यपाल  चे. विद्यासागर राव  यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या   उपस्थितीत मंत्रालय आणि विधि मंडळ वार्ताहर संघातर्फे देण्यात येणारे पत्रकार पुरस्कार राज भवन मुंबई येथे बुधवारी (दि १०) सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

 

जेष्ठ पत्रकार  विजय दत्तात्रय वैद्य यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर सुहास सरदेशमुख (लोकसत्ता), सरिता कौशिक (एबीपी माझा) व संदीप आशर (इंडियन एक्सप्रेस) यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आले.  

                                                                                                                    

कार्यक्रमाला पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, प्रवीण दरेकर, मंत्रालय आणि विधि मंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, वार्ताहर संघाचे पदाधिकारी तसेच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.