Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

04.01.2018

मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीचे अध्यक्ष तथा इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के कस्तुरीरंगन यांनी गुरुवारी (दिनांक ४) राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली.

यावेळी निवड समितीचे सदस्य डॉ. श्यामलाल सोनी आणि सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी देखील उपस्थित होते.