Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

03.01.2018

मधुकरराव किम्मतकर यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

मधुकरराव किम्मतकर यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

राज्याच्या हितासाठी पोटतिडकीने लढणारा आदर्श लोकप्रतिनिधी गमावला: विद्यासागर राव

महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्य विधान परिषदेचे माजी सदस्य आणि विदर्भ विकास मंडळाचे सदस्य अॅड. मधुकरराव किम्मतकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

मधुकरराव किम्मतकर महाराष्ट्रातील एक अभ्यासू आणि लढ्वय्ये नेते होते. राज्याच्या आणि विशेषतः विदर्भाच्या प्रश्नांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते आयुष्यभर पोटतिडकीने झटले. विकासविषयक प्रश्न मांडताना त्यांनी कधीही पक्षीय अभिनिवेश बाळगला नाही. विदर्भ विकास मंडळाचे ते सर्वात जुने आणि अनुभवी तज्ज्ञ सदस्य होते. राज्याची नियोजन प्रक्रिया आणि अनुशेष प्रश्नांचा, विशेषतः जलसिंचन, रस्ते विकास विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास होता. विदर्भाच्या न्याय्य मागण्यांसाठी ते अनेकदा भेटत व भेटीनंतर सर्व स्तरावर आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करत. त्यांची बुद्धिमत्ता आणि समस्यांचे विश्लेषण करण्याची हातोटी विलक्षण होती. किम्मतकर यांनी सामान्य जनतेशी असलेली आपली नाळ आयुष्यभर जपली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने लोककल्याणाची कळकळ असलेला एक आदर्श अभ्यासू लोकप्रतिंनिधी गमावला आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.