Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

31.12.2017

नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी २०१८  हे साल राज्यातील नागरिकांना विशेषतः शेतकरी, कष्टकरी यांना सुख, समाधान आणि भरभराटीचे जावो तसेच आपले राज्य प्रगतीच्या वाटेवर सातत्याने अग्रेसर राहो. सन २०१८ साठी मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.