Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

29.12.2017

कमला मिल कम्पाउंड आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

मुंबई, दि .29 :लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत झालेल्या जीवहानीबद्दल राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या निरपराध व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना लवकर आराम पडोअशी प्रार्थना करीत आहे,” असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.