Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

24.12.2017

नाताळ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला नाताळ तसेच नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

धर्म,जात,पंथ,वंश या सीमांपलीकडे जाऊन आज जगातील सर्व लोक नाताळचा सण मोठया उत्साहात साजरा करीत आहेत. हा सण येशू ख्रिस्तांचे उदात्त जीवन व त्यांनी मानवतेसाठी केलेल्या त्यागाचे  स्मरण देतो.  येशूंच्या जीवनातील दया,बंधुभाव व सर्वसमावेशकता सर्वांना मार्गदर्शक ठरो, अशी या प्रसंगी कामना करतो, तसेच राज्यातील जनतेला नाताळ व नववर्षाच्या  हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.