Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

07.12.2017

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ

वृ.वि. 7507                                                     16 मार्गशीर्ष, 1939 ( 02.30)

            दि. 7 डिसेंबर, 2017

 

 

सशस्त्र सेना  ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ

 

मुंबई, दि. 07: सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन मोहिमेचे शुभारंभ राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आज करण्यात आले.

यावेळी कामगार आणि माजी सैनिकांचे कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार मंगलप्रभा लोढा, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर- सिंह, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी दिपेंद्र कुशवाह, व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा, लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग, एअर मार्शल मायकल फर्नांडिस, संचालक कर्नल सुहास जलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

            सैनिक कल्याण विभागाच्या वतीने ध्वजदिनानिमित्त सैनिक मित्र या विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बेल्या वर्षात उत्कृष्ट निधीसंकलन करणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.


००००

Mahanews