Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

04.12.2017

शशी कपूर यांचे रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीसाठी योगदान लक्षणीय : राज्यपाल

राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शशी कपूर यांचे भारतीय चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमीसाठी लक्षणीय असे योगदान राहिले आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी तीन दशकांपेक्षा अधिक काळ गाजविला. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीप्रती आपली निष्ठा आणि बांधिलकी जपली. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या एका महत्वपूर्ण कालखंडाचा साक्षीदार पडद्याआड गेला असल्याचे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.