Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

30.11.2017

ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी ईद ए मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला  ईद ए मिलाद हा सण प्रेषितांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. समाजातील गोर-गरीब व उपेक्षितांप्रति आपल्या कर्तव्याची जाणीव यातून प्रत्येकाला होते. ईद ए मिलादचा पवित्र सण परस्पर बंधुभाव व सौहार्द वृद्धिंगत करो.  राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु - भगिनींना ईद-ए-मिलादनिमित्त मी  हार्दिक शुभेच्छा देतो असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.