Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

26.11.2017

26/11 च्या अतिरेकी हल्ल्यातील शहीद पोलिसांना राज्यपाल व मुख्यमंत्री यांची आदरांजली

मुंबईदि. 26 :  मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राज्यपाल चे विद्यासागर रावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस जिमखाना येथील स्मृती स्थळावर आदरांजली वाहिली.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेशालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेगृह राज्यमंत्री दीपक केसरकरआमदार राज पुरोहितभाई जगतापमुख्य सचिव सुमित मलिकगृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तवपोलीस महासंचालक सतीश माथूरमुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरशहीद अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुटूंबीयवरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी तसेच शहीद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी स्मृती स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमानंतर राज्यपाल व मुख्यमंत्री महोदयांनी शहीद कुटुंबीय आणि उपस्थित अधिकारी यांच्याशी संवाद साधला. तसेच यावेळी उपस्थित फोर्स वन च्या कमांडोजची पाहणी करून माहिती घेतली.