Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

26.11.2017

दहशतवादाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सामुहीक प्रयत्न आवश्यक - राज्यपाल चे.विदयासागर राव

मुंबई दि.26 .   दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. दहशतवाद ही जागतिक समस्या  आहे. याचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य तसेच सामुहीक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे .विदयासागर राव यांनी केले.

          बॉम्बे जिमखाना येथे आयोजित माँ तुझे सलाम’ या शहिदांना अभिवादन करण्यासाठीच्या सांगितीक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजूआमदार राज पुरोहित यांच्यासह विविध देशांचे वाणिज्य दूत उपस्थित होते.

          17 वर्षापूर्वी संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी गृह राज्यमंत्री म्हणून कार्यरत असल्याची आठवण सांगून राज्यपाल म्हणाले कीसंसदेच्या हल्ल्यानंतरही सभागृहाचे कामकाज स्थगित ठेवले नाही.  दहशतवाद आम्हाला थांबवू शकत नाही असा संदेश या माध्यमातून आम्ही जगाला दिला. मुंबईवर झालेल्या अनेक हल्ल्यांपैकी 26/11 चा हल्ला हा सर्वात दुर्देवी हल्ला होता. या हल्ल्यात तसेच त्यानंतर तीन दिवस चाललेल्या हल्ल्याविरोधी धुमचक्रीत आपले शूर जवान तसेच अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. दहशतवाद हा मानवतेला असलेला सर्वात मोठा धोका आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणांसोबतच नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे.

          मुख्यमंत्री म्हणाले की26/11 च्या दहशतवादी हल्ला ही आपल्याला दिलेली भळभळती जखम आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात सीसीटीव्ही नेटवर्कएनएसजीच्या धर्तीवर फोर्स वन आदीसह सुसज्ज यंत्रणा कार्यरत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहीद विजय साळस्करअशोक कामटेहेमंत करकरे यांच्यासह तुकाराम ओंबळे यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

          केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी मुंबईकरांच्या धैर्याला सलाम केला. ते पुढे म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाचा ठोस सामना करण्यासाठी केंद्र शासन कटीबद्ध आहे. आपला देश कोणताही दहशतवाद खपवून घेणार नाहीअसा इशाराही त्यांनी दिला.

          यावेळी वेगवेगळ्या देशांच्या वाणिज्य दूतांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी अजंता फार्मा यांच्यावतीने योगेश अग्रवाल यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री यांना 1 कोटी 2 लाखाचा धनादेश सैनिक कल्याण निधीसाठी सुपूर्त केला. मुख्यमंत्री सहायता निधीला देखील अजंता फार्माच्यावतीने निधी देण्यात आला.

          कार्यक्रमात शिलाँग चेंबर ऑफ कॉयर या संगीत समुहाच्या वतीने विविध गीत सादर केले. गायिका अमृता फडणवीस यांनी देखील आपल्या सूरांनी शहीदांना आदरांजली वाहिली.

00000