Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

22.11.2017

आदिवासी नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

आदिवासी नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

 

रक्तनाते संबधातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा आदेश रदद कराण्याची मागणी

 

 

आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या एका २० सदस्यीय शिष्टमंडळाने बुधवारी (दि. २२) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे  भेट घेऊन त्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केली.

 

जात वैधता प्रमाण पत्राच्या आधारे रक्त नाते संबधातील कुटूंबातील इतर व्यक्तींना कुठलिही तपासणी न करता जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण रदद् करावे तसेच या संदर्भातील दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ चा शासन निर्णय रदद करावा अशी मागणी शिष्ट मंडळाने राज्यपालांकडे केली.

 

माजी मंत्री मधुकर पिचड,  शिवाजीराव मोघे, पदमाकर वळवी, सुहास नाईक तसेच इतर लोकप्रतिनीधी यावेळी उपस्थित होते.