Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

09.11.2017

सोलापूर विद्यापीठ कुलगुरु निवडीसाठी समिती गठीत

सोलापूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यपाल तथा कुलपती चे विद्यासागर राव यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश पी वेंकटरामा रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत केली आहे.

 

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रायपूरचे संचालक प्रा. भरत भास्कर तसेच  शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी हे या कुलगुरु निवड समितीचे सदस्य असतील.

 

विद्यमान कुलगुरु प्रो एन एन मालदार यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात, 10 डिसेंबर 2017 रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी ही निवड समिती गठित केली आहे.