Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

04.11.2017

राज भवन पुणे येथील सौर उर्जा प्रकल्पाचे उदघाटन

राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या शुभ हस्ते उदया रविवार दिनांक 05 नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुणे येथील राज भवन येथे १ मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे.

राज भवन पुणे येथे सौर उर्जा निर्मीती प्रकल्पातून 1 .६५ लाख  यूनिट  वीज निर्मीती होईल तसेच    3500 सोलर पॅनेल  बसविण्याचे काम वर्षभरात पुर्ण करण्यात आले आहे.  आठ कोटी रुपये गंतवणुकीच्या या प्रकल्पातून मुंबई पुणे आणि नागपूरच्या तिन्ही राजभवनची  वीजेची आवश्यकता पुर्ण होऊन अतिरिक्त वीज निर्मीती होणार आहे. सौर उर्जा वापरल्यामुळे 2500 ते 3000 टन कोळसा वाचू शकेल. तसेच कार्बन एमिशन 1500 टन प्रतिवर्षे एवढे कमी होऊ शकेल.   एवढ्या मोठ्या प्रमाणात सौर उर्जा निर्माण करणारे पुणे राज भवन देशातील राजभवनांमध्ये अग्रणी ठरले आहे.

          या कार्यक्रमास पालक मंत्री पुणे, गिरीश बापट, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.