Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

04.11.2017

लॅटव्हिया देशाच्या पंतप्रधानांनी घेतली राज्यपालांची भेट

भारत दौऱ्यावर आलेले लॅटव्हिया देशाचे पंतप्रधान  मॉरीस कुसिन्स्कीस यांनी आज ( शनिवार, ४ नोव्हेंबर) रोजी  उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

 

यावेळी महाराष्ट्र तसेच लॅटव्हिया देशातील  शैक्षणिक, औदयगिक तसेच सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावे यासाठी समन्वय वाढविण्यात यावा या संदर्भात चर्चा करण्यात आली.

 

लॅटव्हिया भारतातील राजदुत, ॲव्हरॉस ग्रोझा, लॅटव्हियातील भारताची राजदुत मोनिका कपील मोहता,  लॅटव्हियाचे  व भारतातील तसेच  महाराष्ट्रातील  वरिष्ठ अधिकारी देखिल यावेळी उपस्थितीत होते.