Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

13.10.2017

दिवंगत राष्ट्रपती अव्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे वाचन प्रेरणा दिवस

दिवंगत राष्ट्रपती ए. पी. जे.  अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेला  वाचन प्रेरणा दिवस शुक्रवारी (दि १३) राज भवन येथे साजरा करण्यात  आला.

 

            राज्यपालांचे परिवार प्रबंधक वसंत सांळुके यांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ए. पी. जे.  अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने राज भवन येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी शासकीय सुटटी असल्याने वाचन प्रेरणा दिवस आज शुक्रवार (दि  13 ऑक्टोबर) साजरा करण्यात आला.