Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

08.10.2017

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी घेतले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे व प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

परळी दि. ०८ ---- राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज सकाळी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यावेळी त्यांच्या सोबत होत्या.

राज्यपाल चे. विद्यासागर राव हे आज बारा ज्योर्तिलिंगां पैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी परळीत आले होते. सकाळी पावणे दहा वाजता नांदेडहून हेलिकॉप्टरने त्यांचे वैद्यनाथ साखर कारखान्याच्या हेलिपॅड वर आगमन झाले. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत होत्या. राज्यपालांचे आगमन होताच आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी देवेंद्रसिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांनी गोपीनाथ गडावरील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. गड परिसरात असलेल्या मुंडे साहेबांच्या पुतळ्याकडे पाहून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी त्यांना गडाची संपूर्ण माहिती दिली. गोपीनाथ गडावरून थेट वैद्यनाथ मंदिरात जाऊन राज्यपालांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.


महान्यूज