Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

13.09.2017

कविकुलगुरु- कालिदास संस्कृत विद्यापीठ कुलगुरु नियुक्तीसाठी डॉ सतीश रेडडी समिती गठीत : सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

कविकुलगुरु कालिदास संस्कृत ‍विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी  डॉ सतीश रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत केली आहे.

डॉ सतीश रेडडी हे केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आहेत. डॉ सतीश रेडडी यांचेसह समितीच्या सदस्यांनी बुधवारी (दि १३) राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली.

नवी दिल्ली येथील लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विदयापीठाचे कुलगुरु प्रा. रमेश कुमार पांडे तसेच सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे या कुलगुरु निवड समितीचे सदस्य असतील.

विद्यमान कुलगुरु डॉ उमा वैद्य यांचा कार्यकाळ दिनांक 18 सप्टेंबर रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी ही निवड समिती गठित केली आहे.