Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

31.08.2017

हूसैनी इमारत दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दु:ख

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी भेंडीबाजार येथील हुसैनी इमारत दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.  या दुर्घटनेत अनेक निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले हे समजून अतिशय वाईट वाटले. दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या आप्तेष्टांना मी आपल्या शोकसंवेदना कळवितो, तसेच जखमी झालेले लोक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.