Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

16.08.2017

पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.  भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक वैचारिक जडणघडणीत पारशी समाजाचे योगदान अनन्य साधारण राहिले आहे. नवरोझचा पवित्र दिवस उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती’  या त्रिसुत्रीचे स्मरण देतो. मी राज्यातील जनतेला आणि विशेषतः पारशी बंधू भगिनींना नवरोझ तसेच पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.