Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

07.08.2017

भगिनींचे अभिनव रक्षाबंधन राज्यपालांच्या हस्ते युवकांना हेल्मेट भेट

रक्षाबंधनानिमित्त ‘सिस्टर्सफॉरचेंज – गिफ्ट अ हेल्मेट’ या अभियानाअंतर्गत राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते आज राजभवन येथे निवडक युवकांना हेल्मेट भेट देण्यात आले.


वाहन चालकांनी हेल्मेट परिधान करूनच वाहन चालवावे व सुरक्षित प्रवास करावा हा संदेश देण्याकरिता यावेळी भगिनींच्या वतीने उपस्थित युवक बांधवांना राज्यपालांच्या हस्ते हेल्मेट भेट देण्यात आले.


महाराष्ट्र – तेलंगणा जागृती या संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.


सुरुवातीला पारंपारिक वेषातील शालेय विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ भगिनींनी राज्यपालांना ओवाळले व राखी बांधली.  


संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुल्गे यांनी राज्यपालांना उपक्रमाची माहिती दिली.

                                                                       

 ***