Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

29.07.2017

पंकृविचे कुलगुरु डॉ. रविप्रकाश दाणी पदमुक्त नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी केली कारवाई

राज्यपाल तथा कुलपती चे विद्यासागर राव यांनी आज अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या सेवा ते भारतीय नागरिक नसल्याच्या कारणाने तात्काळ प्रभावाने समाप्त केल्या आहेत.

 

डॉ दाणी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र शासनाचा विधी व न्याय विभाग, राज्याचे महाधिवक्ता तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांचेकडून अभिप्राय  मागविल्यानंतर त्यांना कुलगुरुपदावरून पदमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.