Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

24.07.2017

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुलगुरु निवडीसाठी न्या. बी सुदर्शन रेड्डी समिती गठीत; समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

नागपूर  येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त  न्यायमुर्ती बी. सुदर्शन रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली   कुलगुरू निवड समिती गठीत करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी ही समिती गठीत केली असून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक  डॉ त्रिलोचन मोहापात्रा  आणि पशु, दुग्ध व मत्स्य विभागाचे सचिव विकास देशमुख हे समितीचे अन्य सदस्य आहेत.

सोमवारी (दि २४ जूलै) न्या. सुदर्शन रेड्डी  यांचेसह समितीच्या दोन्ही सदस्यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली.

माफ्सुचे विद्यमान कुलगुरु आदित्य कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ  ७ सप्टेंबर २०१७ रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी ही निवड समिती गठीत केली आहे.