Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

13.07.2017

सत्ताधारी आणि जनतेतील दरी संपविण्याचे कार्य प्रधानमंत्र्यांनी केले - राज्यपाल चे. विद्यासागर राव

महान्यूज

            मुंबईदि. 13 : कोणताही महत्वाचा निर्णय घेताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सव्वा कोटी जनतेला नेहमीच विश्वासात घेतले. त्यामुळेच एखादा निर्णय कडवट वाटत असला तरी देशहिताच्या दृष्टीने असलेले त्याचे महत्व लक्षात घेऊन लोकांनीही नेहमीच अशा निर्णयांचे स्वागत केले. सत्ताधारी वर्ग आणि जनता यांच्यामध्ये पूर्वी असलेले मोठे अंतर दूर करण्याचे महत्वपूर्ण कार्य प्रधानमंत्र्यांनी केले आहेअसे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

             इंडिया टुडेचे माजी ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 3 वर्षाच्या कारकिर्दीवर आधारित लिहिलेल्या व पेंग्विन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘मार्चिंग विथ अ बिलियन’ (Marching With A Billion) या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल चे विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज राजभवन येथील समारंभात झाले. त्यावेळी राज्यपाल श्री. विद्यासागर राव बोलत होते. यावेळी शालेय व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडेआदिवासी विकास मंत्री विष्णू सावरापर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावलदिग्दर्शक मधुर भांडारकर आदी उपस्थित होते. 

             राज्यपाल श्री. विद्यासागर म्हणालेनोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर कायदा हे दोन महत्वपूर्ण निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतले. राजकीय दृष्ट्या हे फार धाडसाचे निर्णय होते. लोकांचा मिळविलेला पाठिंबा गमावण्याचा धोका या निर्णयांमध्ये होता. पण तरीही देशहिताला प्राधान्य देऊन प्रधानमंत्र्यांनी हे निर्णय घेतले आणि त्यामागे असलेली प्रधानमंत्र्यांची स्वच्छ भावना लक्षात घेऊन लोकांनीही या निर्णयांचे स्वागत केले. मागच्या फक्त तीन वर्षाच्या कालावधीत प्रधानमंत्र्यांनी देशाच्या सामाजिकआर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोठे क्रांतिकारी बदल घडविले. निर्णय प्रक्रियेत त्यांनी लोकांचा सहभाग वाढविलाअसे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

             पुस्तकाचे लेखक उदय माहुरकर यांनी इंडिया टुडेमध्ये असताना अहमदाबाद येथे मोठा कालावधी व्यतित केला. विद्यमान प्रधानमंत्री हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना माहुरकर यांनी त्यांचे कामकाज तिथे अनुभवले आहे. शिवाय मागील तीन वर्षातील प्रधानमंत्र्यांच्या कामकाजाचेही ते निरीक्षण करीत आहेत. त्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करणारे पुस्तक लिहिण्याचा त्यांना आपसूक अधिकार प्राप्त होतो. आपल्या पुस्तकात त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या कार्याचे समीक्षण केले असून या विषयाला त्यांनी न्याय दिला आहे. प्रधानमंत्र्यांनी  घेतलेले विविध निर्णयधोरणे आणि त्यांचा दृष्टीकोन याचे माहुरकर यांनी योग्य विश्लेषण आणि समीक्षण केले असून ते निश्चितच कौतुकास्पद आहेअसेही राज्यपाल श्री. विद्यासागर राव म्हणाले.

             यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तीन वर्षातील कार्यकाळावर पुस्तक लिहिण्याचे काम कठीण आहे. मात्र ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर यांनी ते काम उत्तमरित्या केले आहे. हे पुस्तक म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळावरील समीक्षण नव्हे तर त्यांनी राबविलेल्या प्रशासनाच्या नव्या मॉडेलचे सार आहे. या नव्या मॉडेलने देशातील जनतेबरोबरच जगभरातील विचारवंत,अभ्यासक आणि विश्लेषक यांना आकर्षित केले आहे. या मॉडेलमधील सर्वच बाजूवर या पुस्तकामध्ये विश्लेषण केले आहे. त्यामुळे भविष्यात संदर्भ म्हणून हे पुस्तक  नक्कीच वापरले जाईल.

             प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आपल्या या नव्या मॉडेलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना केंद्र शासनाशी जोडले आहे. शासनाच्या धोरणामध्ये कार्पोरेट क्षेत्राबरोबरच सामान्य जनतेला सामावून घेतले गेले आहे. त्यामुळे जनतेला हे आपले सरकार वाटते. डिजिटल पेमेंट सुविधेसाठी सुरू केलेले भीम अॅप व भीम आधार अॅप हे केंद्र शासनाचे सगळ्यात मोठे नाविन्यपूर्ण व क्रांतिकारी पाऊल ठरले आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केंद्र शासनाच्या धोरणामध्ये राज्यांनाही सामावून घेतले आहे. निती आयोगाच्या माध्यमातून नियोजन करत असताना राज्यांचा सहभाग घेतला. त्यामुळे प्रत्येक राज्याचे म्हणणे केंद्र शासनासमोर मांडता येत आहे. त्यामुळेच वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करत असताना सर्वच राज्यांचे सहकार्य त्याला लाभले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरणनोटाबंदीचा निर्णयवस्तू व सेवा कर या निर्णयांवर या पुस्तकात विश्लेषण केले आहे. श्री. मोदी यांनी सुधारणेपेक्षा परिवर्तनावर भर दिला आहे. या परिवर्तनाचे प्रतिबिंब श्री. माहुरकर यांनी या पुस्तकात दाखविले आहेअसेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

             यावेळी श्री. तावडे म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तीन वर्षाच्या कामगिरीकडे तटस्थपणे पाहून त्यावर पुस्तक लिहिण्याचे काम श्री. माहुरकर यांनी केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या गिव्ह इट अपमहिलांसाठी गॅस कनेक्शनस्वच्छ भारत अभियानइज ऑफ डुइंग बिझनेसअशा विविध योजनांची माहिती पुस्तक रुपात येणे आवश्यक होते. भविष्यात आर्थिकसामाजिक व राजकीय विषयावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन गव्हर्नन्स स्कूल ऑफ थॉटची सुरूवात केली आहे.

            दिग्दर्शक श्री. भांडारकर यांनीही पुस्तकाला शुभेच्छा देऊन हे पुस्तक लोकप्रिय होईलअशी आशा व्यक्त केली. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले तर मिनी ऐश्वर्य यांनी आभार मानले.

 

००००