Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

11.07.2017

राज्यातील जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करावे - राज्यपाल चे. विद्यासागर राव

महान्युज

शेती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

राज्यातील जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करावे

राज्यपाल चे . विद्यासागर राव

शेतकरी कर्जमाफी निर्णयाबद्दल राज्यापालांनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

 

मुंबईदि. 11 : जलयुक्त शिवार अभियान सिंचनाची यशकथा ठरली आहे. शेतीला सिंचनाची व्यवस्था होण्यासाठी भविष्यात राज्यातील नदीतलावकालवे या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अभियान हाती घ्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात 2014चे शेती पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होतात्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई उपनगरचे पालक मंत्री विनोद तावडेकृषीमंत्री पांडुरंग फुंडकरमुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाईपशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकरकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतकृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल यावेळी म्हणाले कीराज्यातील शेतकऱ्यांनी देशाच्या कृषी विकासात मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगांमुळे महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल दिसून येत आहे. कृषी विद्यापीठांपेक्षा शेतकऱ्यांनीच विविध प्रयोग आणि संशोधन करुन उत्पादनात वाढ केल्याची दिसून येते. राज्याच्या कृषी क्षेत्रात महिला शेतकरी देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घराबरोबरच शेतीचीही जबाबदारी सांभाळताना दिसतात.

लहरी हवामान हे शेतीपुढील मोठे आव्हान असून, त्याला सामोरे जाण्यासाठी हवामान बदलावर आधारित कृषी कार्यक्रम राबविले पाहिजे. जेणेकरुन गारपीटअवकाळी पाऊसपूर या संकटामुळे शेतीच्या उत्पादनावर होणारा परिणाम कमी करणे शक्य होईल. फलोत्पादनामुळे महाराष्ट्र देशात अग्रेसर असून आंबाद्राक्षकेळीडाळिंब आणि संत्रा यांच्या उत्पादन आणि निर्यातीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. या निर्णयामुळे 89 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून 40 लाख शेतकरी कर्जमुक्त होणार आहे. शाश्वत शेतीसेंद्रीय शेतीफलोत्पादनफूल शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये महाराष्ट्राला आदर्श राज्य बनवुया, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

पुरस्कारार्थी शेतकरी राज्य शासनाचे कृषीदूत’- मुख्यमंत्री

 पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले कीपुरस्कारार्थी हे राज्य शासनाचे कृषीदूतआहे. त्यांनी राज्यभर दौरे करुन शेतकऱ्यांना आपण केलेल्या प्रयोगांचे मार्गदर्शन करावे. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनव प्रयोग राज्यातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांचा फायदा कृषी उत्पादन वाढीस होईल. या माध्यमातून आपणाला कर्जमाफीतून कर्जमुक्तीकडे वाटचाल करणे सुकर होईल. ज्या भागात शेतकरी आत्महत्त्या मोठ्या प्रमाणावर आहे तेथे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी कृषीदुतांची भूमिका बजवावीअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

राज्यातील शेती क्षेत्रासमोर समस्यांचे आव्हान आहे. उत्पादन खर्च जास्त त्या तुलनेत उत्पन्न कमी अशी स्थिती असताना नानाविध प्रयोगांच्या माध्यमातून शेतीचा विकास साधता येतोअसे पुरस्कारार्थी शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. यामुळे शेतीच्या क्षेत्राला या माध्यमातून आशेचा किरण दाखवला आहे.

राज्यातील शेती फायद्यात आणण्यासाठी उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाने उपक्रम हाती घेतले आहे. गेल्या 2 वर्षात शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करुन यावर्षी कृषी व कृषीसंलग्न क्षेत्रासाठी 25 हजार कोटींची तरतूद असलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या काही महिन्यात विक्रमी असे विजेच्या जोडण्या देण्यात आल्या. संरक्षित सिंचनाची उपलब्धता करुन दिल्यास शेतकऱ्यांना बहुविध पिके घेता येतील.

 शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज देण्यासाठी पिककर्जाची रचना केली गेली. राज्यात गेली 4 वर्ष सातत्याने दुष्काळी परिस्थितीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळावे याकरिता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 34 हजार कोटीची कर्जमाफी केली असून कर्नाटकपंजाबआंध्रप्रदेशतेलंगणा या राज्यांपेक्षा सर्वात मोठी कर्जमाफी महाराष्ट्राने जाहीर केलीअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कर्ज घेऊन ते फेडण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये निर्माण करणे म्हणजेच शेतकरी कर्जमुक्त झाला असे कर्जमुक्त या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना मुख्यमंत्री यांनी सांगितले. पुढील 3 वर्षात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी भर देण्यात येणार असून सोलर फिडरच्या माध्यमातून कृषी पंपांना दिवसा 12 तास वीज देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या संदर्भातला प्रायोगिक तत्वावरील पहिला प्रकल्प राळेगणसिद्दी येथे लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वीजपाणी याची उपलब्धता करुन शेतीचे उत्पादन वाढवितानाच कृषी मालाला बाजाराशी जोडणे महत्वपूर्ण काम हाती घेण्यात येणार आहे. शेतमाल तारण योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळून देण्यात येणार आहे. शेतकरी आणि बाजार यांच्यातील दलालांची साखळी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शेतकरी गटांना प्राधान्य देण्यात येत आहे. याबरोबरचे विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे.

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला निषेध

अमरनाथ येथील झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरुंना तसेच निधन झालेल्या दोन कृषी पुरस्कार विजेत्या  शेतकरी  यांना श्रद्धांजली अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरनाथ येथील हल्ल्याचा निषेध केला. निरपराध लोकांवर हल्ला करुन अतिरेकी केवळ एका देशाचे नाही तर मानवतेचे शत्रू ठरले आहे. अतिरेकी कधीच जिंकू शकणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

भाजीपाला उत्पादन वाढीसाठी सावता माळी पुरस्कार देणार- कृषिमंत्र्यांची घोषणा

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले कीमर्यादित साधन सामुग्रीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पादन वाढीसाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. राज्यात उन्नत शेतीसमृद्ध शेतकरीच्या माध्यमातून प्रथमच तालुका उत्पादक वाढीचा घटक म्हणून धरला जात आहे. स्थानिक परिस्थितीनुसार उत्पादकता वाढीची उद्दिष्टे ठरविली जात आहे.

मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत 2 वर्षासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 20हजार 276 शेततळींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून 42 हजार 318 कामे पूर्ण झाली आहेत. अटल सौर कृषी पंप योजने अंतर्गत 10 हजार सौर कृषी पंपांची उभारणी करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

पुरस्कारार्थी शेतकऱ्यांच्या प्रयोगांमुळे कृषी विकासाला चालना मिळाली आहे. पुरस्कारांमध्ये पुढील वर्षापासून भाजीपाला उत्पादन वाढीसाठी सावता माळी पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्र्यांनी यावेळी केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थी शेतकरी यांना धनादेशसन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अमरनाथ येथे यांत्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यक्‌रम प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचा औपचारीक स्वागत समारंभ रद्द करण्यात आला. यावेळी मृत यात्रेकरु व 2 पुरस्कार विजेते शेतकरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

विविध पुरस्कारार्थी असे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार : विश्वासराव आनंदराव पाटील रु.75,000/- रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र.

वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार : 50, 000 रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र

दिलीप नारकरप्रेमानंद महाजन,आनंदराव गाडेकरमच्चिंद्र कुंभारआनंदराव मटकरशेषराव निखाडेदत्तात्रय गुंडावार

 जिजामाता कृषिभुषण पुरस्कार : पुरस्कारार्थी महिलांना प्रत्येकी रुपये 50,000/-  रोख स्मृतीचिन्ह आणि  सन्मानपत्र. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे- माधुरी भोईरसुनिता रावताळेवैशाली पवारविद्या रुद्राक्ष,  लक्ष्मीबाई पारवेकर

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार :-पुरस्कारार्थींना रुपये 30,000/- रोखस्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे- व्यंकट कुलकर्णीचैताली नानोटे

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार :- पुरस्कारार्थींना रुपये 11,000/- रोखस्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे- सर्वसाधारण गट-राजेंद्र पाटीलदेवेंद्र राऊतचिंधा पाटीलहिम्मतराव माळीअंजली घुलेबाळासाहेब काकडेरमेश जाधवदत्तात्रय पाटील,आनंदा  पाटीलदत्तात्रय चव्हाणशिवाजी बनकरव्यंकटी गीतेशिवाजी कन्हेरेधनंजय घोटाळेरवींद्र मेटकरसचिन सारडाशालिग्राम चाफलेरियाज कन्नोजेअविनाश कहाते आदिवासी गट- बाळकृष्ण पऱ्हाडकल्पनाबाई बागुलदिगंबर घुटेमारोती डुकरेझापू जामुणकरवडू लेकामी

उद्यान पंडीत पुरस्कार : 25,000/- रु रोख,प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे -  प्रकाश ठाकूरसुभाष गुंजाळ,रवींद्र पाटीलगणपत पारटेभीमराव शेंडगेदत्तात्रय फटांगरेपुष्पा खुबाळकरहिम्मतराव टप्पे

कृषी भूषण ( सेंद्रिय शेती ) पुरस्कार : रू.50,000/- रोख स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे - मधुकर मोहपेनारायण चौधरीनीता बांदलप्रदीप निकमबाळासाहेब जीवरखनासरी चव्हाणसुधाकर कुबडेदिलीप कुलकर्णीमानस रुरल डेव्हलपमेंट इंस्टीट्यूट

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार : राज्यातील कृषि विभागात काम करणाऱ्या आणि राज्याच्या कृषि क्षेत्राच्या विकासासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यास पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

 विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे : विनय आवटेप्रदीपकुमार अजमेराभागीनाथ गायके

००००