Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > रूपरेखा-माननीय राज्यपाल

रूपरेखा-माननीय राज्यपाल[परत जा]छापाprint

श्री काटीकल शंकरनारायणन

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी हे उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक धुंरधर लोकनेते राहिले आहेत. दिनांक १७ जून १९४२ रोजी जन्मलेले भगत सिंह कोश्यारी अल्मोडा महाविद्यालय येथे शिकत असताना विद्यार्थी संघटनेचे महासचिव म्हणून निवडून आले. त्यानंतर त्‍यांनी उत्तरप्रदेश मधील एटा येथे काही काळ अध्यापनाचे कार्य केले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे निष्ठावान स्वंयसेवक असलेल्या कोश्यारी यांना आणिबाणीला विरोध केल्यामुळे सन १९७५ ते १९७७ या कालावधीत तुरुंगवास भोगावा लागला.

सन १९९७ साली ते उत्तर प्रदेश विधान परिषदेवर निवडून गेले. उत्तराखंड राज्याच्या निर्मिती नंतर तेथील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते उर्जा, पाटबंधारे,न्याय व विधी मंडळ कामकाज मंत्री  झाले. सन २००१ साली ते उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री झाले. सन २००२ ते २००७ या कालावधीमध्ये ते उत्तराखंड राज्य विधानसभेमध्ये विरोधीपक्ष नेते होते. सन २००८ साली कोश्यारी उत्तराखंड राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले. ते भारतीय जनता पक्षाचे आखिल भारतीय उपाध्यक्ष तसेच उत्तराखंड राज्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  देखिल राहिले आहेत. सन २०१४ साली ते  नैनिताल-उधमसिंगनगर लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले.

समाजसेवेचा पिंड असलेल्या कोश्यारी यांनी उत्तराखंड राज्यात अनेक शाळा व महाविद्यालयांची स्थापना केली. कोश्यारी यांचा जनसंपर्क दांडगा असून उत्तराखंड राज्यातील टिहरी धरण प्रकल्पग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

उत्तराखंड मधील पिथोरगड येथुन प्रकाशित केल्या जाणाऱ्या पर्वत पियुष या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक राहिले आहेत. त्यांची दोन पुस्तके उत्तरांचल प्रदेश क्यो?’ आणि उत्तरांचल: संघर्ष एवं समाधान प्रकाशित झाली आहेत. दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.